Ad will apear here
Next
सामाजिक बांधिलकी जपून साजरी केली दिवाळी
मुंबई : मुंबईतील गुरुनानक महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाने सामाजिक जाण राखणारी दिवाळी साजरी केली. त्यांनी शांतिवन येथील वृद्ध व कुष्ठरोगग्रस्त व्यक्तींबरोबर दिवाळी साजरी केली. 

प्राचार्य डॉ. विजय दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक सुमित खरात यांनी या दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी वृद्ध व कुष्ठरोगग्रस्त व्यक्तींसोबत संवाद साधला. त्यांना दिवाळी फराळ व भेटवस्तूंचे वाटप केले. आपल्या घरापासून दूर असणारे आजी, आजोबा कसे राहतात, याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती घेतली 

‘विद्यार्थ्यांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले. आपण सामाजाचे देणे लागतो. त्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. म्हणून राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आम्ही दर वर्षी या ठिकाणी दिवाळी साजरी करण्यासाठी घेऊन येतो. जेणेकरून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मदत होईल. गुरुनानक महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग नेहमीच प्रात्यक्षिकांवर भर देत विविध विषय  शिकवतो. सामाजिक बांधिलकी ही संकल्पना समजण्यासाठी असे कार्यक्रम उपयोगी पडतात. गेली पाच वर्षे राज्यशास्त्राचे विद्यार्थी वृद्धाश्रम व कुष्ठरोगग्रस्त व्यक्तींना आपल्या रिकाम्या वेळात भेट देतात व मदत करतात. विद्यार्थी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात,’ असे  प्राध्यापक सुमित खरात यांनी सागितले.

या वेळी धनाजी शिंदे यांनी प्रथमोपचार किट, आफरीन शेख यांनी दिवाळीची मिठाई व आलिशा स्वामी हिने दुपारचे जेवण आपल्या बचत केलेल्या पैशांतून देऊन दिवाळी साजरी केली. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZUIBU
Similar Posts
पोरबंदरमधल्या दिवाळीची आठवण काही कामानिमित्त पोरबंदरला गेलेल्या मनोहर जोगळेकर यांना दिवाळीच्या कालावधीतही तिथेच राहावे लागले होते. त्या वेळच्या आठवणी जागवणारा हा त्यांचा लेख...
आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरलेली दिवाळी... दिवाळीत केलेला व्यवसाय हा आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ कसा ठरला, याबद्दल लिहीत आहेत बोरीवलीचे नितीन जोगळेकर...
भिवंडीत पारंपरिक आदिवासी दिवाळी महोत्सव भिवंडी : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आदिवासी विकास क्षेत्रात काम करणाऱ्या येथील विजेता विचार फाउंडेशन आणि जायंट्स ग्रुपचा सहेली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडीतील काटई येथील डोंगरपाडा दिवानमाल या आदिवासी पाड्यावर पाच नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत पारंपरिक आदिवासी दिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
कवींनी जपली सामाजिक बांधिलकी बोरीवली : मुंबईतील ध्यास कवितेचा काव्य मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या काव्य संमेलनात हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या काही कुटुंबांना दिवाळीत दोन घास सुखाचे खाता यावे या हेतूने ‘एक घास मायेचा, सामाजिक जाणिवेचा’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमातून कवींनी ११५ किलो धान्यदान करून सामाजिक बांधिलकी जपली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language